Tag Archives: पोटेशियम मेटा बाय सल्फेट

खस चे सरबत

साहित्य:

  • ५० ग्रॅम खसच्या काड्या
  • २ कि. साखर
  • १ लि. पाणी
  • २ लहान चमचे खस एसेंस
  • २ लहान हिरवे रंग
  • १/२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

कृती:

खस चे सरबत

खस चे सरबत

खस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा. एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या. थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या. सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.