Tag Archives: बदाम

खरवसाची बर्फी

साहित्य :

  • २ फुलपात्रे चीक
  • २ फुलपात्रे दुध
  • ४ फुलपात्रे साखर
  • ७-८ वेलदोड्यांची पूड
  • थोडा केशरी रंग व केशर
  • थोडे बदाम-पिस्त्याचे कप.

कृती :

खरवस करण्यासाठी चीक शक्यतो दाट असावा. पहिल्या दिवसाचा चीक दाट असतो.चीक, दूध व केशरी रंग एकत्र करा. नंतर एका स्टीलच्या डब्यात ओता. मोदकपात्रात हे पातेले ठेवून चीकशिजवून घ्या. नंतर बाहेर काढून थंड होऊ द्या.नंतर ह्या घट्ट खरवसाच्या वड्या किसणीवर किसाव्या. हा कीस व साखर एकत्र करून गॅसवर ठेवा. सतत हलवत राहावे. वेलदोड्याची पूड व केशर घाला. बदाम-पिस्त्याचे काप घाला. गोळा होत आला की तूप लावलेल्या थाळीत थापा. बेताच्या आकाराच्या जाड व चौकोनी वड्या कापा.