Tag Archives: बेसन

मसाले वडा

मसाले वडा

मसाले वडा

साहित्य :

  • १ वाटी हरभरा डाळ
  • २ कांदे बारीक चिरुन
  • ४-५ मिरच्या व १ इंच आले बारीक वाटून
  • २ टेबलस्पून डाळीचे पीठ
  • अर्धा चमचा हळद
  • १ चहाचा चमचा तिखट
  • १ चिमूट सोडा
  • मीठ
  • तळण्याकरता तेल

कृती :

हरभरा डाळ स्वच्छ निवडून धूवून भिजत टाकावी. ३-४ तास डाळ भिजल्यावर चाळ्णीत निथळून वाटावी. फार बारीक वाटू नये. मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये वाटली तर पाणी जास्त लागते. छोट्या चटणी ग्राईंडरमध्ये पाणी न घालता वाटावी. वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेला कांदा, आले, वाटलेली मिरची, तिखट, मीठ, थोडी हळद, २ टेबलस्पून डाळीचे पीठ व चिमुटभर सोडा घालून चांगले कालवावे. पसरट कढईत तेल गरम करुन वाटलेल्या डाळीचा छोटा गोळा हातात घेवून थोडा चपटा करुन कढईत सोडावा. लाल रंगावर खरपूस तळावा. वरील साहित्यात १०-१२ डाळ वडे होतात.