Tag Archives: भोपळा

लाल भोपळ्याची बर्फी

साहित्य :

  • ४ वाट्या भोपळ्याचा कीस
  • ३ वाट्या साखर
  • १ वाटी ओले खोबरे
  • १ वाटी खवा
  • १ डाव साजूक तूप
  • ५-६ वेलदोड्यांची पूड
  • ५ बदामाचे काप
  • थोडी पिठीसाखर.

कृती :

थोड्या तुपावर कवा परतून घ्यावा व बाजूला ठेवावा. थोड्या तुपावर भोपळ्याचा कीस घालून परतावा. वाफवून घ्यावा.नंतर त्यात खोबरे व साखर घालावी व शिजवावे. मिश्रण घट्टसर झाले की खवा, वेलचीपूड घालावी. खाली उतरवून थ्डी पिठीसाकर घालून घोटावे व तूप लावलेल्या थाळीत घालून थापावे. वरून थोडी पिठीसाखर भुरभुरावी. बदामाचे काप पसरून पुनः थापा. गार झाल्यावर वड्या पाडा.