Tag Archives: भोपळी मिरची

भोपळी मिरच्यांची भाजी

साहित्य :

 • ५०० ग्रॅम भोपळी मिरची
 • १ वाटी चणा डाळ
 • २ कांदे
 • १ चमचा लाल तिखट
 • पाव चमचा हळद
 • १ चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • ४-५ चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • १ चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • ओले खोबरे

कृती :

भोपळी मिरच्यांची भाजी

भोपळी मिरच्यांची भाजी

डाळ दोन तास भिजत ठेवावी. नंतर निथळून त्यात अर्धा चमचा जिरे घालून भरड वाटावी किंवा कुटावी.

मिरच्या धुवून पुसाव्या. दोन उभे भाग करून बिया, देठ व आतल्या गर काढून टाकावा. मिरच्या व कांदे बारीक चिरावे.

रुंद पातेल्यात तेल तापले की मोहरी, जिरे व हिंग घालून त्यावर कांदा बदामीसर रंग येईपर्यंत परतावा. मिरच्या घालून ढवळावे. हळद, तिखट, मीठ व साखर घालावी.

२-३ मिनिटे झाकण ठेवावे. झाकणावर पाणी ठेवावे. ५-७ मिनिटांत मिरच्या मऊ होतील. त्यावर वाटलेली डाळ घालावी.

गरम पाण्याचा हबका द्यावा व पुन्हा झाकण ठेवून भाजी शिजवावी. मंद आंचेवर भाजी शिजली की ढवळून उतरवावी.

आवडत असल्यास थोडे ओले खोबरे वरून घालावे व वाढावी.