Tag Archives: भोपळ्याच्या पुऱ्या

भोपळ्याच्या पुऱ्या

साहित्य :

  • पाव किलो भोपळा
  • पाव किलो गूळ
  • अर्धा किलो कणीक
  • ४०० ग्रॅम तेल
  • १ डावभर तांदळाचे पीठ
  • मीठ

कृती :

भोपळा किसून त्यात गूळ चिरून घालावा. हे मिश्रण गुळाचे पाणी होईपर्यंत गरम करावे. ते थंड झाल्यावर त्यात कणीक, चिमूटभर मीठ, तांदळाचे पीठ व अर्धी वाटी तेल गरम करून घालावे. नेहमीच्या कणकीप्रमाणे कणीक भिजवून त्याच्या पुऱ्या करून तळाव्यात.

टीप : ह्या भोपळ्याच्या पुऱ्या धान्यफराळास चालतात.