Tag Archives: मंगेशकर कुटुंबीय

जयोस्तुते श्रीमहान्मंगले

जयोस्तुते श्री महन्मंगले । शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रे भगवती ! त्वामंह यशोयुतां वंदे ॥धृ॥

राष्ट्राचे चैतनय मूर्त तू नीति-संपदाची
स्वतंत्रते भवति ! श्रीमती राज्ञी तू त्यांची ॥१॥

परवशतेच्या नभांत अतूंची आकाशीं होशी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखशी ॥२॥

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तुंच जी विलसतसे लाली ॥३॥

तूं सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ॥४॥

मोक्ष मुक्ती ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती ॥५॥

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते ॥६॥

हे अधम-रक्तरंजिते । सुजन-पूजिते । श्रीस्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन । तुजवीण जनन ते मरण ॥७॥

तुज सकल चराचर शरण । चराचर शरण
स्वतंत्रते -स्वतंत्रते – स्वतंत्रते