Tag Archives: मंगेश पाडगावकर

भेळपुरी

भेळपुरी

भेळपुरी

साहित्य :

 • ४ मोठ्या वाट्या चुरमुरे
 • १०० ग्रॅम बारीक शेव
 • १ कैरी किंवा १ लिंबू
 • ३ मध्यम कांदे
 • ३ मध्यम बटाटे
 • २ मोठे टोमॅटो
 • थोड्या कडक पुर्‍या
 • थोडी तिखट चटणी
 • थोडी गोड चटणी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ

कृती :

प्रथम गोड चटणी व तिखट चटणी करुन ठेवावी. बटाटे थोडी हळद व मीठ घालून उकडावेत. नंतर साली काढून बारीक फोडी कराव्यात. टोमॅटो व कैरी बारीक चिरुन घ्याव्यात. नंतर चुरमुरे, बटाट्याच्या फोडी, टोमॅटो, कैरी, मीठ व कडक पुर्‍यांचे तुकडे सर्व एकत्र करावे आणि डिशमध्ये भरुन त्यावर थोडी गोड चटणी व थोडी तिखट चटणी घालावी. वरुन कोथिंबीर व बारीक शेव घालून १ कडक पुरी ठेवून खायला द्यावे.