Tag Archives: मंत्रालय

आग विझली अन ठिणगी पडली

छगन भुजबळ आणि मुंबई मंत्रालय

छगन भुजबळ आणि मुंबई मंत्रालय

इथे मंत्रालयातील आग विझली आणि लगेच नव्या वादाची ठिणगी पडली. वाद असा आहे की, आगाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभागाची की, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाची. अग्निशमन सुरक्षेकरिता वित्त विभागानेही निधी कसा उपलब्ध करुन दिला नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील उच्चपदस्थ या कहाण्या बोलू लागले आहेत.

हा वाद आपल्याकडे येऊ शकतो याची शक्यता लक्षात घेत, छगन भुजबळ म्हणाले की, ‘ही जबाबदारी केवळ माझ्या एकट्याची नव्हती. फायर ऑडिटमधील ३२ पैकी ३१ शिफारशींची पूर्तता केली.’ मंत्रालय इमारतीची मालकी सामान्य प्रशासन विभागाची म्हणजे पर्यायाने मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडील खात्याची असल्याचे भुजबळांनी सांगितले.

नेमक्या कोणत्या सोयीसुविधा मंत्रालयात आग लागल्यास असाव्यात, फायर ऑडिटमध्ये याबाबत शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्या शिफारशींची अमलबजावणी न झाल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजि व्यक्त केली आहे. ‘आपल्या एकट्यावरच मंत्रालयाची सुरक्षा नव्हती. तर बाकीच्या खात्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली का, ते पहावे,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.