Tag Archives: मधमाशी

खंडोबा आणि मधमाशी

एका मधमाशीने मधाने भरलेले एक भांडे खंडोबास नेऊन दिले. खंडोबा फार खूष होऊन मधमाशीस म्हणाला, ‘तुला जे काय वाटेल ते मजपाशी माग, मी देतो.’ मधमाशी म्हणाली, ‘देवा ! मी ज्या प्राण्यास आपली नांगी मारीन, त्या प्राण्यास फार वेदना व्हाव्या, अशी शक्ति मला दे.’ मधमाशीचे हे दुष्टपणाचे मागणे ऐकून खंडोबास फार राग आला. तो म्हणाला, ‘ज्या अर्थी मी वचन देऊन चुकलो, त्या अर्थी तुझे मागणे मी तुला देतो; पण एक गोष्ट लक्षांत ठेव की, ज्या ठिकाणी तू आपली नांगी मारशील, त्या ठिकाणीच ती तुटून जाईल व त्यामुळे तू मरण पावशील.’

तात्पर्य:- लोकांस त्रास देण्याची इच्छा धारण करणारा मनुष्य स्वतःच दुःख भोगतो.