Tag Archives: मधल्या वेळचे पदार्थ

कोबी मुठिया

कोबी मुठिया

कोबी मुठिया

साहित्य :

 • १ कप किसलेला कोबी
 • १ कप ज्वारीचे पीठ
 • ५ टे. स्पू. लो फॅट दही
 • १ टे. स्पू. कोथिंबीर
 • लिंबूरस
 • १ टी. स्पू. मिरची-आले पेस्ट
 • १ टी. स्पू. लसूण पेस्ट
 • चिमूटभर सोडा
 • मीठ
 • साखर
 • हळद
 • १ टी. स्पू. तेल
 • हिंग
 • जीरे
 • कढीपत्ता

कृती :
कोबी व मुठियाचे इतर साहित्य एकत्र करुन रोल करुन वाफवावे. तुकडे करुन तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावे. कोथिंबीर पेरुन गरम खायला द्यावे.