Tag Archives: मराठवाडा विद्यापीठ

यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दांचे सामर्थ्य

यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण

ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, मधुकर भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण पुणे केंद्र आयोजित यशवंतराव चव्हाण यांचे लेख, साहित्य व भाषणे यांचा समावेश असलेल्या आणि राम प्रधान संपादित ‘शब्दांचे सामर्थ्य’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी झाले. प्रतिष्ठानचे पुणे केंद्राचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर या वेळी उपस्थित होते.

यशवंतराव यांच्याकडे प्रत्येक विषयात दुरदृष्टी होती. राजकीय जीवनातच नव्हे तर साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यामुळे हातात सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग न करता त्यांनी शुल्क माफीची योजना खेड्यातील गरिबांच्या मुलांना शिकता यावे यासाठी राबवली. त्यांनी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती केली. विद्यार्थ्यांना त्यांची पदवी स्वीकारण्यासाठी लांब जाण्याची गरज पडू नये, त्यासाठी त्यांनी एवढे मोठे कार्य केले. आपल्या बॅंकेच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे आपली पत्नी वेणूताई यांना परदेश दौऱ्यावर इच्छा असतानाही यशवंतरावांना घेऊन जाता आले नाही, अशा अनेक आठवणींना उपस्थितांनी त्या कार्यक्रमात उजाळा दिला.