Tag Archives: मराठी माणूस

पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त जागल्या अक्षरस्मृती

पु. ल. देशपांडे

पु. ल. देशपांडे

अवघ्या महाराष्ट्राला हसवून जीवन आनंदाने भरवून देणारे पु. ल. देशपांडे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त स्नेहसेवा संस्थेतर्फे एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘निवडक पुलं’ असे या कार्यक्रमाचे नाव होते व पुलंच्या साहित्यातील काही प्रवेशांचे वाचन या कार्यक्रमात करण्यात आले. प्रा. सुधा जावडेकर यांनी समाजसेविकेची ओळख हा भाग, तर उषा आकोलकर यंनी पुणेकर, मुंबईकर हा प्रवेश सादर करुन दाखवला.

पुलंची निर्मितीक्षमता आणि कल्पक्ता, तसेच आर्थिक व्यवहारातील त्यांचा ढिसाळपणा अशा दोन्ही बाजू सुनीताबाईंच्या ‘आहे मनोहर तरी,’ या पुस्तकाचे अभिवाचन करताना मांडल्या गेल्या. आधुनिकतेमध्ये सामान्य माणूस कसा गुरफटला जातो हे चित्र शैला पळसुले यांनी ‘अपूर्वाई’ मधून रसिकांपुढे सादर केले. ‘रविवारची सकाळ’, ‘वार्‍यावरची वरात’ मधील प्रवेश गीता भुर्के यांनी सादर केला. अजित कुंटे यांनी ‘दुसर्‍याचे घर पाहताना येनारा वैताग’ हा प्रवेश केला. पुलंच्या साहित्याची मेजवानी विविध प्रवेशातून रसिकांना चाखता आली
प्रा. नलिनी गुजराती यांनी पुलंच्या हसवणूक पुस्तकातील काही भाग सादर केला. प्राचार्य श्याम भुर्के यांच्या हस्ते कार्यक्रमाचा समारोप झाला. ते म्हणाले की, ‘पुलंनी मराठी माणसाला खळखळून हस्ता येईल अशा साहित्यांची निर्मिती केली. दुःखाला कधीही कुरवाळत न बसता त्यांनी नेहमी सकारात्मक जपण्याचा प्रयत्न केला.’

‘स्नेहसेवा’ चे अध्यक्ष माधव बांदिवडेकर यांनी स्वागत केले व सुधन्वा रानडे यांनी आभार मानले.