Tag Archives: मलबार

मलबार किनारा

मलबार किनारपट्टी हे गोवा ते कन्याकुमारी यामधील किनारपट्टीचे नाव आहे.

मलबार किनारा :- मलबार किनारा हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणतम भाग म्हणून ओळखला जातो. हा किनारा पूर्वेकडे पश्चिमघाट व पश्चिमेकडे अरबी समुद्र यांच्यामध्ये आहे. हा किनारा वाळूच्या उंचवट्याचा पट्टा आहे. अनेक लहान लहान खार्‍या पाण्याचे उथळ जलाशय या किनार्‍याला आतील बाजूस आहेत. हे जलाशय लहान कालव्यांनी परस्परांना जोडली गेल्यामुळे त्याचा उपयोग प्रवासासाठी व मालवाहतुकीसाठी सर्रास केला जातो.

किनार्‍याचे कोची (पूर्वीचे कोचीन) हे मुख्य बंदर आहे.