Tag Archives: महागाई

महागड्या गॅस ला स्वस्त पर्याय

महागड्या गॅस ला स्वस्त पर्याय

महागड्या गॅस ला स्वस्त पर्याय

सप्टेंबर महिन्यापासून वर्षभरात केवळ सहा सिलेंडवर सबसिडी देण्याचे केंद्राने जाहीर केले. ७व्या सिलेंडर साठी बाजारभावाने रक्कम मोजावी लागणार आहे. बाजारभावाच्या रक्कमेबाबत अजुनही शाशंकता आहे. केंद्र सरकार च्या या निर्णायानंतर लगेचच बाजारभावाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली. गेल्या महिन्यात सबसिडी वगळता सिलेंडरसाठी दर ८०५ रुपये ५० पैसे असा होता. हा दर १ ऑक्टोबर पासून ९३४ रुपये झाला. ऎण सणासदासूदीच्या तोंडावर झालेल्या या भावावाढीने सामान्य माणासाचे तोंडचे पाणीच पळाले आहे. ही तर झाली फक्त सिलेंडर ची भाववाढ इतर अनेकही अनेक वस्तुंची भाववाढ सामान्यंना सोसावी लागणार आहे, परंतु वर्षाला केवळ सबसिडीचे सहा सिलेंडर हा सरकरचा निर्णय सामान्य माणसाला अजुनही न पचणारा आणि न परवडणारा आहे. घराघरातील गृहीणींचे बजेट तर या निर्णायामूळे पूर्ण कोलमडून गेले आहे. मराठीत एक म्हण आहे पावसानं झोडपलं राजानी मारलं तर दाद कोणाकडे मागायची तसच आता सामान्य जनतेचं झालं आहे. त्यातच सणसुदी आल्यानं या निर्णयाची झळ जास्त जाणवत आहे.

सरकार आणि अर्थ तज्ञांच्या मते सबसिडी हा आर्थिक प्रगती मधला अडथळा आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी.चिंदब्रम यांनी देशाची आर्थिक प्रगती बळकट करण्यासाठी काय करता येईल यावार विचार करण्यासाठी माजी अर्थ सचिव विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने सबसिडी ही आर्थिक विकासातील मुख्य अडचण असून त्या हटवण्याची शिफारस केली होती. या समितीच्या मते लोकांना सबसिडीग्रस्त जीवन जगण्याची चटक लागली आहे. स्वयंपाकाचा गॅस वापरणारा ग्राहक गरिब नसतॊ. त्यामूळे कमी पैशात गॅस देण्याचे काहीच कारण नाही.

केळकर समितीच्या शिफारसी सुज्ञ जनतेला मान्य होतील ही, परंतू भारतासारख्या देशात जिथे गरिबांची संख्या मोठी आहे तिथे सबसिडी अपरिहार्य आहे. आज देशातले अनेक भ्रष्टाचाराचे घोटाळे उघडकीस आले आहेत. जर सरकारला हे घोटाळे परवडू शकतात तर सामान्यांना सबसिडी देणं का नाही. सरकारच्या मते स्वयंपाकाचा गॅस वापरणारा माणूस गरिब नसतो, पण सरकरनेच सबसिडी दिल्यानेच सामान्य माणसाने गॅस जोडणी घेतली. म्हणजे आता तर सामान्य माणसाने स्वप्न ही पाहायची नाहीत. न जाणो त्या वरही उद्या टॅक्स लावला जाईल. ही भाववाढ अटळ आहे त्यामूळे च आता स्वयंपाकच्या गॅस ला पर्याय शोधणं गरजेचं झालं आहे.
इडकश्न कूकर , सुर्य कूकर यांसारख्या उपायांवर अधिक जागृती होणं गरजेचं आहे.

घराघरातील गृहीणींचे बजेट कोलमडलं आहे. त्याची यावावत काय मत आहे हे जाणूण घेऊ या.

सुज्ञ नागरिक म्हणुन सरकरचा हा निर्णय योग्य आहे पण त्याची अंमलबजावणी बजावणी अशाप्रकारे व्हायला नकॊ. सरकर ने हळूहळू सिलेंरर्स ची संख्या कमी करयाला हवी होती. अशा प्रकारे सामान्य माणसाची मानसिकता या भाववाढीला तयार झाली असाती. तरही जर गृहींणी काही नियम वापरले तर गॅस ची बचत होऊ शकते.
भाजी साठी कुटूंबाला आवश्यक तेवढयाच आकाराचा कुकर वापरवा

छोट्या आणि मोठ्य़ा दोन्ही कूकर मध्ये वाफ धरली गेली की गॅस बारिक ठेवावा.
डाळ, तांदूळ १५ ते २० मिनिटे आधि भिजवल्याने लवकर शिजतात.
– राजश्री अभंग

या भावाढीने महिन्याभराचे बजेट्च कोलमडून गेले आहे. नोकरदार माणूस काटकसर करून हे निभावून नेईल ही, पण कष्ट्करी वर्गाचे काय. सरकार ने त्यांचा ही विचार करयाला हवा होता.
– अनुराधा हटकर.

सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? जरूर कळवा