Tag Archives: महाराष्ट्र टाईम्स

महाराष्ट्र टाईम्सचे नागपूरात आगमन

महाराष्ट्र टाईम्स

महाराष्ट्र टाईम्स

प्रख्यात कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी मंगळवारी झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या नागपूर आवृत्तीच्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले की, नागपूरात ‘महाराष्ट्र टाईम्स’चे आगमन ही ऐतिहासिक मोलाची बाब आहे. विदर्भा हा महाराष्ट्राचाच भाग असल्याची भावना महाराष्ट्र टाईम्स बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. मनोहर यांनी नमूद केले की, ‘विदर्भामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा भाग आदिवासीबहुल आहे. या प्रदेशात नक्षलवादाचा मोठा प्रश्न आहे. मटाने अशा परिस्थितीत नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-भामरागड या भागाच्या चष्म्यातून दुनिया वाचली पाहिजे व तेथील प्रश्नांची चिकित्सा केली पाहिजे.’

महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी प्रास्ताविक केले. पानवलकर यांनी ग्वाही दिली की, नागपूरात मटाचे आगमन ही संख्यात्मक वाढ नसून गुणात्मक वाढ आहे. काही दिवसांत ‘मटा’ हा नागपूरकरांच्या जीवनातला अविभाज्य भाग बनलेला असेल.’

‘महाराष्ट्र टाईम्स ‘काळानुरूप’ बदलत असल्यामुळे त्याची मांडणी, मजकूर सारेच बदलले. पेपर रंगीत देणे आणि मजकूर कलरफूल देणे या वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी मटाने केल्या. मटाने शिक्षण, करिअर, तरुणाई यावर लक्ष केंद्रित करुन तरुणाईला सकारात्मक दिशा देण्याचे काम या पुढेही करीत राहणार आहे,’ असेही ते म्हणाले. ‘आरएमडी’चे उपाध्यक्ष विकेश वालिया यांनी विश्वास व्यक्त केला की, ‘नागपूरात महाराष्ट्र टाईम्स’ची सुरुवात व्हावी, ही बरीच जुनी मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे व विदर्भातही मटा आपली नाममुद्रा उमटवेल.’

‘मनाने, धनाने व ज्ञानाने आजचा मराठी माणूस पुढे जात आहे. आम्ही मराठी माणसाच्या संपन्नतेवर लक्ष केंद्रीत केले आहे,’ असे टाईम्स ग्रुपचे संचालक रणजित काटे म्हणाले.
रणजित काटे यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे स्वागत केले. अशोक पानवलकर यांनी डॉ. मनोहर यांचे स्वागत केले. सूत्रसंचालनाची जबाबदारी रेणुका देशकर यांनी पेलली. निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी आभार मानले.