Tag Archives: महाल

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सव प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, तार्‍यांकडे पहावे
पभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोर्‍या, त्यातुनी होती चोर्‍या
दारास नाही दोर्‍या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहन सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या ॥७॥