Tag Archives: मालपुए

मालपुए

साहित्य :

 • दीड वाटी मैदा
 • अर्धी वाटी रवा
 • अर्धा चमचा मीठ
 • १ चिमूट सोडा
 • १ लिटर साईसकट चांगले दूध
 • २ मोठे चमचे मिल्क पावडर
 • १ मोठा चमचा बेदाणा
 • १ चमचा बडीशेप
 • तळणीसाठी तूप

पाकासाठी :

 • २५० मिली पाणी
 • ८ मोठे चमचे साखर
 • २ चिमट्या किंवा अर्धा चमचा केशर
 • ४ वेलच्यांची पूड
 • ४ बदाम
 • ३-४ थेंब गुलाबाचा (रोझ) एसेन्स (ऐच्छिक)

कृती :

केशर गरम करून खलात बारीक करावे व चमचाभर पाण्यात भिजत ठेवावे. बदाम उकळत्या पाण्यात ठेवून साल काढावी व पातळ काप करावे. दूध निम्मे होईपर्यंत आठवावे. मैद्यात मीठ व सोडा घालून एकत्र चाळावे. त्यात मिल्क पावडर, बडीशेप व बेदाणा मिसळावा. आटवलेले दूध गार झाले की मैद्या हळूहळू मिसळावे. तास भार झांकून बाजूला ठेवावे. साखरेत पाणी घालून सुधारसाइतपत पाक करावा. त्यात केशर व वेलचीपूड घालावी.

तव्यावर किंवा जाड बुडाच्या फ्राईंग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप घालावे. एक मोठा चमचाभर किंवा मध्यम डावभर मिश्रण त्यात घालावे. सुरीने किंवा केळीच्या जाड पानाने त्याची तळहाएवढी पुरी सारवावी. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत व कडा कुरकुरीत होईपर्यंत तळवी व तळून लगेच पाकात टाकवी. अशा तऱ्हेने सर्व मालपुए करावे. फ्राईंग पॅन मोठे असल्यास एका वेळेला दोन किंवा तीनसुद्धा काढता येतात.

पाकात दोन मिनिटे ठेवून चाळणीवर किंवा ताटात तिरपे ठेवून निथळावे म्हणजे जास्तीचा पाक ओघळून येईल.

मारवाडी व बंगाली समाजात हे लोकप्रिय पक्वान्न आहे.