Tag Archives: मिक्स भाजी

मिक्स भाजी रस्सा

साहित्य :

 • लाल भोपळ्याचे वाटीभर तुकडे
 • दोन बटाटे
 • दोन रताळी
 • हिरव्या मिरच्या
 • थोडे जिरे
 • थोडे दाणेकूट
 • थोडा नारळ खव
 • चिरलेली थोडी कोथिंबीर
 • लवंगा दोन
 • थोडे तूप
 • चवीसाठी थोडा गूळ आणि थोडा चिंचकोळ
 • मीठ

कृती :

मिक्स भाजी रस्सा

मिक्स भाजी रस्सा

रताळी, बटाटे स्वच्छ धुऊन साली काढून फोडी करून एक भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला.

नारळ खव. मिरच्या, जिरे बारीक वाटून घ्या. गरम तुपात हे वाटण परता.

वाटण बाजूला काढून ठेवा. त्याच भांड्यात उरलेले तूप गरम करा. त्यात लवंगा परता. परतल्यावर भाज्यांच्या फोडी त्यात घाला. चांगले लालसर परता.

पाणी घालून झाकण ठेवून शिजवा. मऊसर शिजल्या की त्यात वाटण,थोडा गूळ व चिंचेचा कोळ, मीठ घाला. परत परता.

रस्सा जसा हवा त्यानुसार पाणी घाला. शिजल्यावर वरून चिरलेली कोथिंबीर पेरा.

रस्साभाजी तयार.