साहित्य:
- फुगीर लहान मिरच्या
- १००ग्रॅम धणेपूड
- ५० ग्रॅम मेथीपूड
- २५ ग्रॅम राईपूड
कृती:
थोडासा देठ ठेवून मिरच्या मधोमध कापून घ्याव्यात. धणेपूड, मेथीपूड, राईपूड व एक चमचा हिंगपूड, चवीपुरते मीठ एकत्र करून त्यावर बेताने मोहरी व हिंग घालून केलेली फोडणी घालावी. हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात आंबट दही घालून ते मिश्रण मिरच्यांमध्ये भरावे.
या मिरच्या घट्ट विणीच्या सुपात ठेवाव्यात व उन्हात वाळवाव्यात.