Tag Archives: मिसळीचा चिवडा

मिसळीचा चिवडा

साहित्य :

 • ५ वाट्या जाडे पोहे
 • १ वाटी हिरवे मूग
 • १ वाटी मसूर
 • १ वाटी काबुली चणे
 • १ वाटी हिरवे वाटाणे
 • १ वाटी हरभऱ्याची डाळ
 • २ वाट्या शेंगदाणे
 • २५ ग्रॅम काजू
 • २५ ग्रॅम बेदाणा
 • १ टे. चमचा खसखस
 • थोडासा कढिलिंब
 • तिखट
 • मीठ
 • हिंग
 • हळद
 • तळण्यासाठी तेल.

कृती :

आदल्या दिवशी रात्री सर्व कडधान्ये व शेंगदाणे वेगवेगळे भिजत घालावे. सकाळी चाळणीवर ओतून पाणी काढून टाकावे व कपड्यावर पसरून कोरडी करावी.कढईत तेल तापत ठेवा. सर्व कडधान्ये वेगवेगळी तळा. दाणे, हरबऱ्याची डाळही तळा. पोहेही तळ, काजू-बेदाणाही तळा. खसखस जरा भाजा.
मोठ्या पातेल्यात थोड्या तेला हिंग, मोहरी, हळद, घालून फोडणी करा. त्यात कढिलिंब टाका. पोहे टाकून जरा ढवळा व खाली उतरवा. सर्व तळलेले पदार्थ कागदावर पसरून जास्तीचे तेल काढून टाका. त्यावर तिखट, मीठ, घालून ढवळ व पोह्यावर घालून ढवळा. पुन्हा एकदा कागदावर ओतून हाताने सारखे करा.