Tag Archives: मिसळ

दही मिसळ

साहित्य :

  • ५०० ग्रॅम मटकी
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • १/२ नारळ
  • लिंबाएवढा गूळ
  • मीठ
  • २ मोठे बारीक चिरलेले कांदे
  • २ मोठे उकडलेले चौकोनी तुकडे करुन बटाटे
  • १०० ग्रॅम बारीक शेव
  • १०० ग्रॅम चिवडा
  • २ वाट्या दही

कृती :

दही मिसळ

दही मिसळ

आदल्या दिवशी मटकी भिजत घालावी. तिला मोड आल्यावर मटकी निवडून घ्यावी.

तेलात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात मोड आलेली मटकी घालावी.

जरा परतून थोडे पाणी घालावे व मटकी शिजू द्यावी.

मटकी शिजल्यावर त्यात वाटलेल्या मिरच्या, गूळ व मीठ घालून उसळ बनवावी.

कोथिंबीर व नारळ घालून उसळ खाली उतरवावी.

उसळीत पाणी अजिबात राहता नये. उसळ गार होऊ द्यावी.

आयत्या वेळी प्लेटमध्ये २ डाव उसळ घालावी.

नंतर त्यावर थॊडा बारीक चिरलेला कांदा घालवा. बटाटाच्या फोडी घालाव्यात.

नंतर त्यावर चिवडा व बारीक शेव घालावी.

वरती १ टेबलस्पून गोड व घट्ट दही घालावे व बटर लावून भाजलेल्या पावाबरोबर सर्व्ह करावे.