साहित्य:
- १ वाटी कणिक
- १ वाटी बेसन
- १/२ लहान चमचा ओवा
- १ चिमुट हिंग
- १/२ लहान चमचा लाल तिखट
- १/२ लहान चमचा मीठ
- तूप गरजेप्रमाणे
- पाणी पीठ मळण्यापुरते
कृती:

मिस्सी रोटी
कणिक व बेसन एकत्र करून बाकी सर्व मसाले टाका.
एक मोठा चमचा तूप व पाणी टाकून पीठ मळून घ्या.
अर्धा तास ओल्या कापडाने झाका पीठाचा एक मध्यम आकाराचा पेढा घेऊन पोलपाटावर लाटण्याने लाटा गरम तव्यावर दोन्ही बाजूने भाजा.
एक बाजू पूर्ण तव्यावर भाजा व दुसरी थोडी भाजून झाल्यावर गॅसवर फुलवा.
गरमागरम तूप लावून वाढा.