Tag Archives: मीरा बोरवणकर

पुण्याचा सिंघम महेश निंबाळकर

महेश निंबाळकर

महेश निंबाळकर

डेक्कन पोलिस ठाण्यातील कर्मचारी महेश निंबाळकर यांनी शहर व जिल्हा पोलिसांकडे दाखल झालेल्या विविध गुन्ह्यात फरारी असलेल्यांपैकी ३० आरोपींना अवघ्या दोन महिन्यात पकडण्याची किमया साध्य केली आहे. निंबाळकर यांनी खून, दरोड, वाहन चोरी, घरफोडी, चोरी आदी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पकडून संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांकडे सुपूर्द केले आहे.

निंबाळकर यांनी एक फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान २६ जणांना पकडले होते. पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी या कामगिरीबद्दल त्यांना १ लाख ३० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले आहे. त्यानंतर उर्वरित ३० जणांना त्यांनी दोन महिन्यात पकडले आहे. निंबाळकर यांनी सांगितले की, या आरोपींना लवकर पकडण्याचे कारण म्हणजे पोलिस निरीक्षक मनोहर जोशी यांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या संपर्कातून मिळालेली अचूक माहिती.

फरासखाना १३,बंडगार्डन, हडपसर ८, स्वरगेट ४, सहकारनगर ४, वारजे माळवाडी ४, चतुःश्रुंगी ४, पिंपरी ३, समर्थ ३, सांगवी, येरवडा, वनवाडी, शिवाजीनगर, विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या प्रत्येकी एक आरोपींना निंबाळकर यांनी पकडले आहे.

शहरातील फरारी आरोपींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात (०२०-२५६७५००५) किंवा ९८२३५६४५४५ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.