Tag Archives: मुंगी

मुंगीची उत्पत्ती

एक शेतकरी नेहमी शेजाऱ्याचे धान्य चोरून नेऊन आपल्या घरात साठा करीत असे. त्यामुळे तो कोणालाही आवडेनासा झाला म्हणून देवाने शिक्षा म्हणून त्याला मुंगीचे रूप दिले. त्यामुळे त्याचे रूप बदलले, परंतु दुसऱ्याचे धान्य चोरून नेऊन साठा करण्याची सवय मात्र बदलली नाही.

तात्पर्य:- कितीही स्थित्यंतरे झाली तरी माणसाचा मूळ स्वभाव काही बदलत नाही.