Tag Archives: मुंबई उच्च न्यायालय

गणपती बाप्पा मातीचाच – हायकोर्टाचे निर्देश

गणपती बाप्पा मातीचाच - हायकोर्टाचे निर्देश

गणपती बाप्पा मातीचाच - हायकोर्टाचे निर्देश

वर्षानुवर्षे पर्यावरणवाद्यांनी उभारलेल्या लढ्याला अखेर मंगळवारी यश लाभले. पर्यावरणीय धोका ओढवून घेणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी गणेशमूर्ती मातीच्याच असाव्यात, हा आग्रह मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केला असून यंदा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेश कोर्टाने दिल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद दाभोळकर यांनी दिली.

घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात साजर्‍या होणार्‍या व सुमारे २ कोटी मूर्ती घडवणार्‍या महाराष्ट्रात प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाला धोका असल्याने दाभोळकर व सचिव अविनाश पाटील यांनी कोर्टात याचिका दाखल केली. केंदीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत केलेल्या शिफारशींची अमलबजावणी करावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. प्लास्टरच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नद्या, तलाव, विहिरींच्या पाणीसोताला धोका पोहोचतो. त्यामुळेच मातीच्याच मूतीर् घडवाव्यात, मूर्तीचा रंग रासायनिक नव्हे, तर वनस्पतींपासून तयार करावा, अशा शिफारशी या मंत्रालयाने केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती डी. बी. भोसले व आर. एम. बोडेर् यांनी केवळ मातीच्याच मूर्ती घडवाव्यात, असा आदेश दिल्याचे याचिकाकर्ते दाभोळकर यांनी स्पष्ट केले. तसेच प्लास्टरच्या मूर्ती घडवणार्‍या मूर्तीकारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड ठोठवावा, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे.