Tag Archives: मुगाच्या डाळीची तिखट पोळी

मुगाच्या डाळीची तिखट पोळी

साहित्य :

 • अर्धा किलो मुगाची डाळ
 • ८-१० मिरच्या
 • १ इंचभर आलं
 • ७-८ पाकळ्या लसूण
 • १ चमचा हळद
 • १ चमचा हिंग
 • मीठ
 • कोथिंबीर
 • अर्धा किलो कणीक
 • अर्धी वाटी तेल
 • १ किलो तांदळाचे पीठ

कृती :

डाळ शिजवून त्यातील पाणी काढून टाकून ती परतून कोरडी करावी. त्यात आलं, लसूण,मिरची, कोथिंबीर वाटून घालावी. नंतर त्यात मीठ, अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून त्याच्या लिंबाएवढ्या गोळ्या कराव्यात. कणकीमध्ये थोडेसे मीठ, तेल, हळद, तिखट, घालून भिजवावी. पुरणपोळीप्रमाणे वरील सारण घालून तांदळाच्या पिठावर पोळ्या लाटून मंद आचेवर भाजाव्यात.