Tag Archives: मूगाच्या डाळीचे पीठ

मूग हलवा

साहित्यः

  • ५०० ग्रा. मूगाच्या डाळीचे पीठ
  • २५० ग्रा. खवा
  • २ चुटकी केसर
  • १ कप कापलेले मेवे
  • ५०० ग्रा. साखर
  • २५० ग्रा. तूप
  • १ चमचा विलायची पावडर
  • २५० ग्रा. दूध

कृतीः

कढईत तूप गरम करून मूगाचे पीठ कमी गॅसवर भाजावे. एका वेगळ्या कढईत माव्यास सोनेरी भाजावे व हलव्यात टाकुन बर्‍यापैकी मिळवावे. एक चमचा पाण्यात केसर घोळुन टाकावे. हलवा जेव्हा तूप सोडावयास लागेल तेव्हा गॅस वरून उतरून घ्यावे.