Tag Archives: मेडिकल

प्रथम वर्षांचे अभ्यासक्रम बदलणार

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठ

पुढील वर्षापासून इंजिनीअरिंग आणि मेडिकल प्रवेशासाठी राष्ट्रीय सीईटी होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा बारावी बोर्डाचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. आता याच पार्श्वभूमीवर पुढील वर्षापासून पुणे विद्यापीठ सर्व शाखांचे प्रथम वर्षांचे अभ्यासक्रम बदलणार आहे.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे (बीसीयूडी) डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर ही घोषणा केली. ‘बारावी बोर्डाचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे सर्व शाखांचे प्रथम वर्षांचे अभ्यासक्रम बदलणे क्रमप्राप्त आहे. याबाबतचे नियोजन लवकरच करण्यात येईल. २०१३ पासून सायन्स इंजिनीअरिंगव्यतिरिक्त बीए-बीकॉमसह सर्व अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे,’ अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.

प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांत २००८ साली सुधारणा करण्यात आली होती. ‘विद्यापीठाने आखलेला अभ्यासक्रम स्वीकारणे सध्या तरी कॉलेजांवर बंधनकारक आहे. मात्र, अंतरविद्याशाखीय दृष्टीकोनास क्रेडिट सिस्टममुळे चालना मिळणार आहे,’ असे सर्व कॉलेजांमध्ये क्रेडिट सिस्टम लागू करण्यासंबंधीचे नियोजन सांगताना ते म्हणाले.