Tag Archives: मेथीची पचडी

मेथीची पचडी

साहित्य :

 • १ मेथीची जुडी
 • १ वाटी दाण्याचे जाडसर कूट
 • २ कांदे
 • २ लिंबे
 • तेल
 • मोहरी
 • हळद
 • मीठ
 • साखर
 • २-३ हिरव्या मिरच्या
 • ५-६ लसूण पाकळ्या

कृती :

मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. नंतर त्यात मिरचीचे बारीक तुकडे घालावेत. साखर, मीठ व लिंबाचा रस दाण्याचे कूट घालून कालवून घ्यावे. तेल घेऊन मोहरी व लसणाची फोडणी करून मिश्रणावर घालावी.