Tag Archives: मोसंबी

फ्रूट सॅलेड

साहित्य :

  • ४ मोठे सफरचंदे
  • ६ संत्रे
  • ६ मोसंबी
  • १० चिक्कू
  • १ मोठा अननस
  • ८ केळी
  • अर्धा किलो गोड द्राक्षे
  • १ कंडेन्स्ड मिल्क डबा
  • ३ कप दूध
  • १ वाटी साखर.

कृती :

सफरचंदाचे साले व बिया काढून बेताच्या आकाराचे फोडी चिराव्या.संत्री व मोसंबी यांची साली काढून गर काढा व सफरचंदाच्या फोडीवर घाला म्हणजे सफरचंद काळे पडणार नाही. चिक्कू साले बिया काढून फोडी करा. अननसच्या मधला दांडा साले व काटे काढून फोडी करा. केळ्याचे गोल काप करा. नंतर त्यात द्राक्षे घाला. दूध व कंडेन्सड मिल्क घालून मिश्रण कालावा. फार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दूध घाला साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करा.