साहित्य :
- २ वाट्या डाळीचे पीठ
- २ वाट्या तूप
- अडीच वाट्या साखर
- पाऊण वाटी खवा
- ७-८ वेलदोड्यांची पूड
- थोडे केशर
- केशरी रंग
- थोडे बदाम-पिस्त्याचे काप
कृती :
मंदाग्निवर तुपावर डाळीचे पीठ खमंग भाजून घ्यावे. खवाही थोडा भाजून ठेवावा.साखरेच्या निम्मे पाणी घालून साखरेचा दोनताई पाककरावा. त्यात केशर व केशरी रंग घालावा. नंतर त्यात भाजलील दाळीचे पीठ व खवा घालून जरा ढवळावे व खाली उतरवावे. वेलदोड्याची पूड घालावी. खाली उतरल्यावर थोड्या थोड्या वेळाने सर्व मिश्रण ढवळावे. मिश्रण हळूहळू जाड होत जाईल. नंतर तूप लावलेल्या थाळीत थापावे. वरून बदामपिस्त्याचे काप पसरावे व पुन्हा अलगद हाताने थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.