Tag Archives: यावच्चंद्रदिवाक्री

यावच्चंद्रदिवाक्री

पेशव्यांच्या दप्तराचे प्रमुख मुत्सुद्दी नाना फ़डणीस यांच्याकडे एक गृहस्थ गेला. त्याच्या जमिनीच्या सनदेचा कागद एकदम खराब झाला असल्यानं, त्याला नव्या कागदावर सनद करुन हवी होती. नानांची भेट घेऊन त्याने त्यांना याप्रमाणे विनंती करताच, नाना म्हणाले, ती जुनी सनद समोरच्या कनोड्यात ठेवा. उद्या मी ती कारकुनाकरवी नव्या कागदावर लिहून घेईन आणि तिच्यावर सही घेऊन ठेवीन.

त्या माणसाला वाटलं, सनद कानोड्यात ठेवली आणि कुठे गहाळ झाली वा उंदराने खाल्ली तर काय ? त्यापेक्षा आपण ती सनद आता घरी नेऊन, उद्याच इकडे आअणावी, असा विचार करुअन, तुआने ती सनद घरी नेली, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तो त्या सनदेसह नानांकडे गेला.

त्याच्याकडे पाहून नाना रागानं म्हणाले, मी तुम्हाला ती सनद या कानोड्यात ठेवून जायला सांगितलं असता, ज्या अर्थी तुम्ही ती घरे घेऊन गेलात, त्याआर्थी तुमचा मजवर विश्वास नाही. मग आता इथून चालते. यावच्चंद्रदिवाक्री तुम्हाला ती सनद नवीन करुन मिळाणार नाही.

नानांकडून अशी समज मिळ्यानंतर तो गृहस्थ हरिपंत अडाक्यांकडे गेला व त्याने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. फ़डक्यांनी त्याला एक युक्ती सुचवून त्याप्रमाणे वागायला सांगितले.त्याप्रमाणे तो गृहस्थ अमावस्येच्या रात्री पुन्ह नानांकडे गेला. त्याला पाहून नाना एकदम भडकून म्हणाले, आकाशात चंड्र सुर्य असएपर्यंत ती सनद नव्याने लिहून दिली जाणार नाही, अस तुम्हाला सांगितल होतं ना मी ? मग पुन्हा कशाला आलात ? चालते व्हा.

यावर तो गृहस्थ नम्रतापूर्वक म्हणाला, आता अमावस्येची रात्र पडली आहे. आकाशात चंद्र नाही व सुर्यही नाही म्हणून आलो.त्या माणसाच्या या चातुर्यपूर्ण उत्तरानं नानांचा रग कुठल्या कुठे निघून गेला. आणि त्यांनी त्या गृहस्थाला त्या सनदेचे पुर्नलेखन करुन दिले.