Tag Archives: रसभाजी

बटाटा रसभाजी

साहित्य :

  • बटाटे सहा
  • अर्धा कप दाणेकूट
  • थोडे तिखट
  • थोडे जिरे
  • थोडे तूप
  • चवीसाठी थोडा गूळ
  • मीठ

कृती :

बटाटे स्वच्छ धुऊन त्याच्या पातळ फोडी करा. कढईत तूप गरम करा. जिरे घाला. जिरे तडतडले की त्यात बटाटे फोडी घाला. थोडे परता. चांगले परतल्यावर त्यात अंदाजाने पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवा. शिजवा. थोड्या वेळाने झाकण काढून फोडी शिजल्या असतील तर त्यात तिखट, मीठ, चवीपुरता गुळ, दाणेकूट टाका. रस किती हवा ते पाहून पाणी टाका. मंद आचेवर पुन्हा एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर उतरवून ठेवा. रसभाजी तयार.