Tag Archives: राजगिरा पिठाच्या उपवासाच्या पुऱ्या

राजगिरा पिठाच्या उपवासाच्या पुऱ्या

साहित्य :

  • दोन वाटी राजगिरा पीठ
  • जिरेपूड दोन चिमटी
  • चवीपुरते तिखट मीठ
  • एक चहाचा चमचा मोहन
  • थोडेसे आले वाटण
  • कोथिंबीर थोडी चिरून
  • तूप

कृती :

फक्त तूप सोडून इतर सर्व जिन्नस एकत्रित चांगले मळून घ्या. थोडा वेळ पीठ भिजू द्या. कढईत तूप गरम करा. पिठाच्या लहान लहान पुऱ्या लाटून तळून काढा. उपवासाच्या चटणी बरोबर गरम पुऱ्या खा.