Tag Archives: रासबेरी

रासबेरी सरबत

साहित्य :

  • १ किलो साखर
  • ४०० मिली.पाणी
  • अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड
  • पाव चमचा रासबेरी रेड कलर
  • अर्धा चमचा रासबेरी इसेंस

कृती :

प्रथम १ किलो साखरेत ४०० मिली. पाणी घालावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. एकत्र करून गॅसवर १ उकळी येईपर्यंत ठेवावे. थंड झाल्यानंतर रंग, इसेंस घालणे व गाळून बाटलीत भरावे. सरबत देताना पाव भाग तयार केलेले लिक्विड आणि पाऊण भाग पाणी किंवा दूध व एखादा बर्फाचा खडा टाकावा.