Tag Archives: रेखा पळशीकर

अकरावीचे अर्ज ऑनलाईन

अकरावीचे अर्ज ऑनलाईन

अकरावीचे अर्ज ऑनलाईन

केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे की, मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने होणार आहे. मात्र, दहावीच्या ऑनलाईन मार्कलिस्टच्या आधारे केवळ अकरावीचे अर्ज देण्यास समितीने मंजुरी दिली आहे. एसएससी बोर्डाचे आवाहन आणि राज्य सरकारचे परिपत्रक यांच्या पार्श्वभूमीवरच तसे करण्यात येणार आहे.

‘दहावीचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर १४ ते २२ जून, या काळात फॉर्म विक्री करण्यात येईल. दहावीची अधिकृत मार्कलिस्ट मिळाल्यानंतरच अकरावीची प्रत्यक्ष प्रवेश प्रकियेला सुरुवात करण्यात येईल. या प्रवेश प्रकियेला मूळ मार्कलिस्टची आवश्यकता आहे कारण ऑनलाईन लिस्टमध्ये फेरफार करणे सहज शक्य आहे,’ असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्या आणि फर्ग्युसनच्या उपप्राचार्य रेखा पळशीकर यांनी सांगितले.