Tag Archives: लस्सी मँगो पल्प

लस्सी मँगो पल्प

साहित्य :

  • हापूस आंबा रस दोन वाटी
  • गोडसर घट्ट दही दोन वाटी
  • ताजे क्रीम दोन टे. स्पून
  • आवश्यकतेनुसार बर्फ

कृती :

मिक्सरमधून दही व आंब्याचा रस एकत्रित काढून एका काचेच्या भांड्यात ओता. त्यात बारीक बर्फाचे तुकडे किंवा चुरा घाला. क्रीम फेटून ठेवा. लस्सी ग्लासात ओतल्यावर त्यावर थोडे थोडे क्रीम घाला. बर्फाचा चुरा वापरायचा नसेल तर लस्सीचे भांडे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ग्लासमध्ये ओतून त्यावर थोडे थोडे टाकून घ्या.