Tag Archives: लांडगा

लांडगा आणि बकरा

एका लांडग्याने एक बकरा डोंगराच्या उंच कडयावर चरताना पाहिला. तेव्हा तेथे आपणास जाता येणार नाही, हे लक्षात आणून तो बकऱ्यास म्हणतो, ‘अरे, तू अशा उंच आणि अवघड ठिकाणी सगळा दिवस चरतोस, हे बरे नाही; एखादे वेळी पाय चुकून खाली पडलास, तर प्राणास मुकशील. त्यापेक्षा, या मैदानात कोवळे कोवळे गवत आणि मधुर मधुर झाडांची पाने आहेत, ही खाशील तर मला समाधान वाटेल.’ बोकड उत्तर करतो, ‘बाबा, तू म्हणतोस ती गोष्ट खरी, पण मला तू भुकेलेला दिसतो आहेस, म्हणून तू आहेस त्या ठिकाणी येऊन मी आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही.’

तात्पर्य: जे लोक स्वार्थी व बुभुक्षित असतात, त्यांनी काही आपल्या हिताची गोष्ट सांगितली आणि ती खरीशी वाटली, तरी त्याजवर विश्वास ठेवू नये. त्यात काही तरी कपट आहे असे समजावे.