Tag Archives: लुनी

लुनी नदी

लूनी ही एकमेव नदी थरच्या वाळवंटातून वाहत जाऊन समुद्राला मिळणारी एकमेव नदी होय.

लुनी :- ही नदी अजमेर शहरानजीक अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावते तिला तेथे सागरमती असे म्हणतात. ती सामान्यतः त्या विभागातल्या डोंगरपठारातून नैऋत्यकडे वाहते. लुनी हे नाव संस्कृतमधील लवणावरी (खारी नदी) या नावावरून तिच्या खारेपणामुळे पडले. या नदीची लांबी ५३० कि.मी. असून या नदीचा पाणीपुरवठ्यासाठी भरपूर उपयोग होतो.