Tag Archives: वरणातल्या वड्या

वरणातल्या वड्या

साहित्य :

 • अर्धा किलो तूर डाळ
 • ३ चमचे लाल तिखट
 • ३ चमचे गोडा मसाला
 • लिंबाएवढा गूळ
 • मीठ
 • ४ आमसुले
 • १ वाटीभर तेल
 • १०-१५ कडीलिंबाची पाने
 • अर्धा किलो कणीक
 • २ चमचे धन्याजिऱ्याची पूड
 • १ चमचा ओव्याची पूड
 • फोडणीचे साहित्य

कृती :

तिखट मिठाच्या पुऱ्यांसाठी भिजवतो त्या प्रकारची कणीक अर्धा किलो भिजवावी. तिखट, मीठ, मसाला, गूळ, आमसुले, घालून तुरीच्या डाळीची आमटी करावी. मोठ्या पोळीप्रमाणे पोळी लाटून शंकरपाळ्यांप्रमाणे किंवा वड्याप्रमाणे सुरीने कापून त्या आमटीत सोडाव्यात मंद आचेवर वड्या शिजू द्याव्यात म्हणजे आमटी आटणार नाही. आपल्याला जर लहान वड्या करून सोडता आल्या तरी छान वाटतात. त्या शिजल्यावर तेलाची खमंग फोडणी घालावी व गरम गरम खाण्यास द्याव्यात.