Tag Archives: वाळवण पदार्थ

वाळवणी डाळ भाजी

साहित्य:

  • चणाडाळ
  • मूगडाळ समप्रमाणात
  • मिरची
  • मीठ

कृती:

चणाडाळ, मूगडाळ दोन तास भिजत घालून नंतर जाडसर वाटावी. वाटलेली मिरची व मीठ त्यात मिसळून छोटे छोटे वडे थापून ते वाळवावेत. भाजी करण्याआधी पाण्यात वडे भिजत घालून नंतर ते फोडणीला टाकावेत. पावसाळ्यात काही भागात भाज्या मिळत नाहीत किंवा त्याच त्याच भाज्यांचा कंटाळा येतो, अशा वेळी बदल म्हणून डाळ भाजी खावी.