Tag Archives: संतोष सेलुकर

पाऊस

शिवाराचा असे राजा त्याची गाणी आज गाऊ
हिंडे रानातून साऱ्या माझा पाऊस भाऊ

लाघे चाहूल मृगाची आल्या पावसाच्या धारा
कोसळली झाडे फार फिरे मोकाट वारा
लख्खं विजेच्या आरशातून क्षण भर सारे पाहू

गेली ढेकळे फुटून वाहे पाणी रानातून
तरारले कोंब दूर दूर शेतामध्ये ओळीओळीतून
कष्ट करून सालभर आता आनंदाने

नदी नाल्याच्या कडेला गुरे रेंगाळली आता
सैरावैरा झाली कशी वर झाकाळून जाता
करा आता आवरासावर शेतातून घरी जाऊ

लाडका तो भाऊराया मला येईल भेटाया
सारे शिवार पालटे गेली बदलून रया
दुष्ट उन्हाच्या झळ्या आता विसरत जाऊ

भाऊ माझा गोजीरवाणा मला बोलावत येई
होते झोपेतून जागी माझी धरणी आई
नाते आमुचे अतूट नित्यनेमाने भेट घेऊ