Tag Archives: साहित्य

बैठक खोलीची सजावट

बैठक खोलीतील सजावट ही देखील घरातील लोकांची अभिरुची दर्शविणारी असते. दर्शनी भिंतीवर राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींच्या आणि देवादिकांच्या प्रतिमा असाव्या. ४-५ जणांची बसण्याची सोय असावी. घड्याळ व एखादी दिनदर्शिका असावी. त्या दिवशीचे वर्तमानपत्र, प्रचलित विषयांवरील पुस्तक, एखादा धार्मिक ग्रंथ, सहज चाळले तरी चांगली माहिती मिळू शकेल, असे एखादे मासिक व काही चांगले संस्कारप्रद साहित्य असावे.