तारवावरील दोन प्रवासी

दोन गृहस्थ एका तारवांत बसून जलपर्यटन करीत होते. ते परस्परांचे अगदी हाडवैरी होते. ते दोघे गलबताच्या दोन टोकांवर बसले होते. काही वेळाने अकस्मात्‌ मोठे वादळ होऊन, ते गलबत आता बुडणार असे सर्वांस वाटले. तेव्हा त्या गृहस्थापैकी एक गृहस्थ खलाशांस विचारतो, ‘अरे, गलबताची कोणती बाजू पहिल्याने बुडेल असे तुम्हांस वाटते?’ ‘ दुसरी बाजू’ असे त्या खलाशांनी उत्तर दिले. गृहस्थ म्हणाला, ‘ठिक आहे तर. माझ्यापूर्वीच माझा शत्रु मरतांना मी पाहीन, यातच मला संतोष आहे.’