उपोषणास टीम अण्णाला परवानगी

अण्णा हजारे

अण्णा हजारे

‘जंतर मंतर’ वर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. प्रत्येक दिवशी उपोषणादरम्यान एक हजार कार्यकर्ते आणि पाच हजार नागरिकांपेक्षा जनसमुदाय वाढवू नये, अशी अट त्यांना घालण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी पावसाळी अधिवेशनाचे कारण सांगून ‘टीम अण्णा’ला बेमुदत उपोषणाची परवानगी नाकारली होती.