आमीरने घेतली पंतप्रधानांची भेट

आमीर खान आणि मुकुल वासनिक

आमीर खान आणि मुकुल वासनिक

मैला वाहून नेणाऱ्या सफाई कामगारांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे, या उद्देशाने अभिनेता आमीर खान याने सोमवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक यांची भेट घेतली. ही भेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली व या भेटीत आमीर खान याने ही व्यवस्था बंद करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी याबाबत ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन दिले. आमीरने ‘सत्यमेव जयते’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात या मुद्द्यावर प्रकाश टाकला होता व पंतप्रधानांना भेटून या विषयावर चर्चा करण्याचेही त्यात म्हटले गेले होते.