पंतप्रधानांवर टाइम या मॅगझीनची टीका

पंतप्रधान टाइम मॅगझीनवर

पंतप्रधान टाइम मॅगझीनवर

अमेरिकेतील ‘टाइम’ या मॅगझीनने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना नापास पंतप्रधान म्हणून ठरविले आहे. या मॅगझीनने म्हटले आहे की, भारताला प्रगतिपथावर नेण्यासाठी जी आर्थिक सुधारणे आवश्यक होती, त्यावर ते ठाम राहिले नाहीत.

७९ वर्षीय मनमोहनसिंग यांचे छायाचित्र ‘टाइम’ या मॅगझीनच्या आशिया आवृत्तीच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केले आहे. ‘एक नापास : भारताला गरज नव्या सुरुवातीची’ असे मुखपृष्ठावर म्हटले आहे. ‘छायेतील माणूस’ या शीर्षकाने लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात भारताला सध्या सामोरे जावे लागत असलेली आव्हाने म्हणजेच, आर्थिक विकासासाठी घसरलेली गती, मोठी वित्तीय तूट आणि रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत चाललेली पत, यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यात असेही म्हटले आहे की, भारत सरकार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे पोखरलेली आहे. सरकारकडे देशाला अर्थिक दिशा देण्याची इच्छाशक्ती नाही.