तिखट मिठाच्या पुऱ्या

साहित्य :

 • अर्धा किलो कणीक
 • ४०० ग्रॅम तेल
 • मीठ
 • २ चमचे साखर
 • २ चमचे लाल तिखट
 • २ चमचे धने-जिरा पूड
 • १ चमचा ओव्याची पूड
 • १ चमचा हळद
 • १ चमचा हिंग
 • १ डाव डाळीचे पीठ
 • १ डाव तांदळाचे पीठ
 • १ डाव रवा

कृती :

कणकीप्रमाणे डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, रवा, मीठ, साखर, तिखट, हळद, हिंग, धन्याजिऱ्याची व ओव्याची पूड व अर्धी वाटी गरम तेल घालून घट्ट भिजवावे. नंतर नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे लाटून तळावे.