तिळाचा हलवा

संक्रातीच्या सणासाठी आपण घरी हलवा करतो. हलवा करण्यापूर्वी साखरेचा पाक करावा लगतो. पाकासाठी थोडीफार मेहनत घ्यावी लागते. तरच हलवा पांढराशुभ्र होतो.
साहित्य : (हलव्याचा पाक):

  • १ किलो चांगल्यातली जाड साखर
  • १ कप दूध
  • अर्धा कप आंबट ताक.

कृती:

एका स्टीलच्या स्वच्छ पातेल्यात रात्री साखरेत दूध घालून ठेवावे.दुसऱ्या दिवशी साखरेत ६ कप पाणी घालून गॅसवर ठेवावे. साखर विरघळ्ली की पांढऱ्या स्वच्छ कपड्यातून हे पाणी गाळून घ्यावे व दुसऱ्या पातेल्यात हे पाणी उकळायला ठेवावे. पाकाला उकळी आली की त्यात ताक घालावे. खूप खळखळून उकळी आली की वर मळी येईल. ती झाऱ्याने बाहेर काढावी. जसजशी मळी जमत जाईल तशतशी झाऱ्याने बाहेर काढावी. नंतर पुन्हा एकदा हा पाक गाळावा व उकळूने झाकून ठेवावा.हलवा करण्यासाठी वातीचा स्टोव्ह ,साधा स्टोव्ह अगर शेगडी वापरतात. स्टोव्हमध्ये तेल भरुन घ्यावे. पुतळेचे तसराळे अगर परात स्वच्छ घासून घ्यावी. पोलीशचे १ मूठ तीळ परातीत घालावे. परात मंदाग्निवर ठेवावी. नंतर चमच्याने अर्धा चमचा पाक तिळावर घालून हाताने ढवळावे. काही वेळाने तीळ थोडेसे कोरडे झालेकी पुन: अर्धा चमचा हाताने ढवळावे. काही तासात तीळ थोडेसे पाकतील. मग त्यात १०-१२ लवंगा,२-४ वेलदोड्याचे दाणे, भोपळ्याच्या सोललेल्या बिया, सोलून चिरलेले बदाम, तिळाच्या मानाने घालावे. नंतर सर्वावर पाक घालून ढवळावे प्रथम तिळाबरोबर ह्या जिनसा घालू नयेत. तिळाला चांगला काटा येऊ लागला की वरील पकलेल्या तिळाचे दोन भाग करवे. एक भाग उचलून बाजूला ठेवावा. दुसऱ्या भागावर पाक घालून हलवा करवा. आपल्याला हवा तेवढा हलवा मोठा झाला की थांबावे. तिळावर पाक घालताना नेहमी पाक गरम असावा. नाजुकपणाने व स्वच्छ्ता बाळगून हलवा करावा. पहिला काढून ठेवलेला भाग परातीत घालून त्यावर पाक घालून हलवा पुरा करावा.
हलवा करताना मधूनमधून परातीला पाक चिकटतो. म्हणून परात धुवून घ्यावी लागते.